मुंबईDahi Handi Govinda News : संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतत: मुंबईसह ठाण्यात जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणात दही हंडी फोडून साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णानं बालपणी 'माखन चोरी' केली होती. त्याचाच एक भाग म्हणून दही हंडी साजरी केली जाते. या दिवशी 'गोविंदा' पथक एकावर एक मानवी थर रचत उंच बांधलेली दही हंडी फोडतात.
कृष्ण जन्माष्टमी अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. सकाळपासून अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसे जाहीर केल्यानं गोविंदा मंडळांमध्ये स्पर्धा आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माहितीनुसार, मुंबईत 77 गोविंदांना दुखापत झाली होती. त्यापैकी 25 जणांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी अठरा जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलय. तर इतर सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.
रुग्णालयात 125 खाटा तयार- 52 लोक सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमधील ओपीडीत उपचार घेत आहेत. गोविंदांना केईएम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, एसटी जॉर्ज हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटलसह विविध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात 125 खाटा तयार ठेवल्या आहेत. ठाणे शहरात दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान जोगेश्वरी येथील एका ३४ वर्षीय महिलेसह ११ गोविंदा जखमी झाले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, 11 जखमींपैकी सात जणांना कळव्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर चार जणांना इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलय.