मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरु आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. पालिकेने दोन दिवसांपूर्वी दादर कोहिनूर क्वेअर येथे पार्किंगच्या जागेत ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्र सुरु केले. मात्र त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाल्याने पालिकेने हे केंद्र दोनच दिवसात बंद केले आहे. आता मुंबईमधील मोकळ्या मैदानांमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन ही मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. मोकळ्या मैदानात ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
दादरमधील ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्र बंद, मोकळ्या मैदानात होणार लसीकरण - मुंबईत मोकळ्या जागेत होणार लसीकरण न्यूज
पालिकेने दोन दिवसांपूर्वी दादर कोहिनूर क्वेअर येथे पार्किंगच्या जागेत ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्र सुरु केले. मात्र त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाल्याने पालिकेने हे केंद्र दोनच दिवसात बंद केले आहे. आता मुंबईमधील मोकळ्या मैदानांमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन ही मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.
दादरमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन -
मुंबईत गेल्या वर्षांपासून कोरोनाचा प्रसार सुरु आहे. हा प्रसार रोखण्यसाठी मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस दिली जात होती. १ मार्चपासून ४५ आणि ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. लसीकरण करताना को विन ऍपवर नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र पालिकेकडून को विन ऍपवर नोंदणी करून येईल त्यांना लसीकरण केले जात होते. यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली. त्यातच आता १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना चालता येत नाही अशा ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअर येथे पार्किंग लॉटमध्ये पालिकेने लसीकरण केंद्र सुरु केले. दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअर येथे पार्किंग लॉटमध्ये पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर वाहनामध्ये बसूनच लस दिली जात होती. लस देण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याने दादर व शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा झाले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. याबाबत वाहतूक पोलीस विभागाने आक्षेप घेतला.
मोकळ्या जागेवर ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन -
त्यानंतर दादर कोहिनूर स्क्वेअर येथील ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्र बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी आता मुंबईमधील मोकळ्या मैदानावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. अंधेरी स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कूपरेज ग्राउंड, शिवाजी स्टेडियम, ओव्हल मैदान, ब्रेबॉर्न स्टेडियम, एमआयजी ग्राउंड, एमसीए ग्राउंड, रिलायन्स जिओ गार्डन, वानखडे स्टेडियम, संभाजी उद्यान मुलुंड, सुभाष नगर ग्राउंड चेंबूर, टिळक नगर ग्राउंड चेंबूर, घाटकोपर पोलीस ग्राउंड, शिवाजी मैदान चुनाभट्टी येथील मोकळ्या मैदानावर हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
या सुविधा द्या -
मैदानात जाण्यासाठी आणि लस घेवून बाहेर पडणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असावी, मैदानाबाहेर किंवा स्टेडियम बाहेर ट्राफिक जाम हाेणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी करावी, एका रांगेत जाण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात यावेत, लगतच्या रस्त्यांवरही ट्राफिक जाम हाेणार नाही याचीही काळजी घ्यावी, मैदाने आणि स्टेडियममध्ये लसीकरणासाठी तात्पुरते शेड उभारावेत, रुग्णवाहिकेसह कामगारांना या ठिकाणी तैनात करावे, माेबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, लस घेणाऱ्यांनाच या केंद्रात प्रवेश द्यावा, 60 वर्षावरील नाेंदणी केलेल्या व्यक्तींनाच या ठिकाणी लस दिली जावी असे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. याबाबतच्या समन्वयाची जबाबदारी पालिकेच्या त्या त्या विभागाच्या उपायुक्तांनी पार पाडावी असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.