मुंबई:महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाने सबंध देशाचे लक्ष वेधुन घेतलेले आहे. एकनाथ शिंदेंचे बंड आणि आमदारांच्या अपात्रते बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे आता शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयाचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहेत.
एकीकडे शिवसेनेत मोठी चलबिचल सुरू झाली आहे शिंदे समर्थक या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. खरी शिवसेना आमचीच असा आधी त्यांनी केलेला दावा खरा ठरला असे त्यांचे म्हणने आहे. तर अनेक शिवसैनिक आणि समर्थक उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत आहेत. मुंबईची ओळख असलेला डबेवाला मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल काहीही असो मात्र आपण उद्धव ठाकरे यांनाच शिवसेना मानतो त्यांच्याच मागे उभे राहू असे मुंबईचे डबेवालांचे म्हणाले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल काहीही येवू द्या त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही.आम्ही डबेवाले, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत कालही होतो, आजही सोबत होत आणी उद्याही सोबत राहू गेल्या काही वर्षात उध्दव ठाकरे यांनी डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रमाणीक पणे प्रयत्न केले आहेत. असे ही त्यांनी म्हणले आहे. शिवसेना आणि डबेवाले यांचे वेगळे नाते आहे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या होत्या. त्यामुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी मोफत सायकल उपलब्द झाल्या.