महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cyrus Mistry Accident Case : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात दोषी महामार्ग प्राधिकरणाला पाठीशी घातले का? वाचा सविस्तर - सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारचा (Cyrus Mistry Accident Case) अपघात होऊन; त्यांचा व त्यांच्या एका सहकार्याचा अपघाती मृत्यू झाला होता. ह्या प्रकरणी चौकशी अंती घटनेच्या 2 महिन्यांनंतर 5 नोव्हेंबर 2022 रोजी वाहन चालक महिला अनाहीता पंडोल यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर महामार्ग प्राधिकरणावर कुठलाही गुन्हा दाखल न (no case registered against guilty Highway Authority) करण्यात आल्याने, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर (question is being raised about functioning police) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Cyrus Mistry Accident Case
महामार्ग प्राधिकरणाला पाठीशी घातले का

By

Published : Nov 7, 2022, 2:25 PM IST

पालघर-मुंबई : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारचा (Cyrus Mistry Accident Case) अपघातात त्यांचा व त्यांच्या एका सहकार्याचा अपघाती मृत्यू झाला होता. ह्या प्रकरणी चौकशी अंती घटनेच्या 2 महिन्यांनंतर 5 नोव्हेंबर 2022 रोजी वाहन चालक महिला अनाहीता पंडोल यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते सदरचा अपघातास महामार्ग प्राधिकरण देखील तितकेच जबाबदार असल्यामुळे, त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल (no case registered against guilty Highway Authority) होण्याचे अपेक्षित होते. मात्र, चालक महिलेवरच गुन्हा दाखल झाल्यामुळे सध्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर (question is being raised about functioning police) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


सायरस मिस्त्री यांचा अपघात रस्त्यांच्या तांत्रिक त्रुटी मुळे झाल्याची शक्यता सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असल्याची कुजबुज सध्या सुरू आहे. मात्र, पोलिसांनी फक्त चालक महिलेवर गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठीशी घालण्याचे सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


मध्यंतरी तलासरी आमगाव येथे दोन अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आमगाव येथील पुलावर पडलेले जीवघेणे खड्डे हे अपघाताचे कारण असल्यामुळे; वाहन चालकासह खड्ड्यांसाठी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.


सायरस मिस्त्री गुजरातकडून मुंबईच्या दिशेला येत असताना चारोटी हद्दीतील सूर्या नदी पुलाला धडकून त्यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यात सायरस मिस्री व त्यांचे सहकारी जहांगीर पांडोल यांचा मृत्यू झाला होता. मिस्त्री यांच्या कारचा अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी महामार्गाची व्याप्ती तीन वहिनी वरून दोन वहिनी इतकी संकुचित होते. त्याठिकाणी रस्ता तीन वरून दोन वहिनीचा होत असल्याचे संकेत चिन्ह किंवा दिशादर्शक फलक देखील लावण्यात आले नव्हते आणि त्यामुळेच चालक अनाहीता पांडोल यांना रस्त्याचा अंदाज आला नसावा व त्यामुळेच अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, चालक अनाहीता पांडोलवर दाखल झालेला गुन्हा पाहता पोलिसांनी एकतर्फी भूमिका घेत वाहन चालकालाच दोषी ठरवले असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच ह्या अपघातात जितका चालकाचा दोष आहे, तितकाच दोष महामार्ग प्राधिकरणाचा असूनच त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details