मुंबई - पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, बेहराम बाग येथील हनुमान चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन १४ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून सर्व जखमींवर नजीकच्या ट्रॉमा केअर व कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत जोगेश्वरी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; १४ जण जखमी - Cylendar blast in jogeshvari, 14 injured
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, बेहराम बाग येथील हनुमान चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन १४ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून सर्व जखमींवर नजीकच्या ट्रॉमा केअर व कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![मुंबईत जोगेश्वरी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; १४ जण जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3347761-689-3347761-1558481871033.jpg)
जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बागमधील हनुमान चाळीत मंगळवारी रात्री गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळवले. या स्फोटात १४ जण जखमी झाले आहेत. यापैकी १३ जणांवर नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात तर एकावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आधिक तपास पोलीस व अग्निशमन दल करत आहे.
जखमींची नावं
- ट्रॉमा केअर रुग्णालय - निरु मलिक (२०), गुडीया गुप्ता, अंश गुप्ता (२), दिपक राय (४७), तौफिक शेख (२०), राहुल सिंग (२३), शकुंतला कागल (४६), शेहनाझ शेख (३०), मल्लिका शेख (१२), उषा उमरे (३०), आलीम शेख (२), प्रियांका नलावडे (२६), अनुष्का सिंग (१८).
- कूपर हॉस्पिटल- गुरंग मलिक (४०).