महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील 5000 तरुणी होणार 'सायबर सखी', राज्य महिला आयोगाचा उपक्रम

मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम सुरू होत आहे. यामध्ये 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

सायबर सखी बातमी
सायबर सखी बातमी

By

Published : Jul 20, 2020, 4:17 PM IST

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ 21 जुलैरोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम सुरू होत आहे. यामध्ये 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

या उपक्रमांतर्गत 100 वेबिनारमधून राज्याच्या 10 शहरातील 5 हजार तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. या वेबिनारचा शुभारंभ उद्या 21 जुलैरोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलीस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details