मुंबई- गृहमंत्री अनिल देशमुख आणि एका महिला पत्रकाराला सोशल माध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्याऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 14 ऑक्टोबरपर्यंत त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक - mumbai police news
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर आप्पा केसरजावंगलकर या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख आणि एका महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात येत होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी कारवाई करत पुण्यातुन आरोपीला अटक केली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर आप्पा केसरजावंगलकर या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख आणि एका महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात येत होती. यासंदर्भात मुंबई सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर तपास करण्यात येत होता.
तपासादरम्यान पुण्यातील चिखली परिसरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील केसर जवळगा येथील तो रहिवासी असून पुण्यात काही कामानिमित्त आला असता गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 6 कडून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, ,सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.