महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : ऑनलाईन लोन, ब्लॅकमेलिंग अन् नग्न फोटोच पाठविला...; आरोपीला कर्नाटकातून अटक - Blackmailing For Online Loan Mumbai

ऑनलाईन स्वरूपात देण्यात आलेल्या कर्जाचे पैसे भरल्यानंतरही फिर्यादीला ब्लॅकमेल करणाऱ्या एका सायबर गुन्हेगारास लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बिजापूर, कर्नाटक येथून 2 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली. प्रकरणातील फिर्यादीस एक अज्ञात व्यक्ती फोन करून आणखी पैसे भरण्याचा तगादा लावत होता. फिर्यादीने असे न केल्याने आरोपीने त्याचा नग्न फोटो मित्रांना पाठवून बदनामी केली. आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Blackmailing To Pay Online Loan
लोन फ्रॉड

By

Published : Apr 16, 2023, 5:31 PM IST

मुंबई: पोलिसांंनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गुन्ह्यातील फिर्यादीने ऑक्टोबर,२०२२ पासून ते फेब्रुवारी, २०२३ दरम्यान एकूण २ लाख ९३ हजार ७०० रुपयांचे ऑनलाईन लोन घेतले होते. या लोनची प्रोसेसिंग फी आणि व्याज वजा करून त्याला एकूण १ लाख ९५ हजार ३९० रुपये लोन रक्कम प्राप्त झाली होती. त्यानंतर फिर्यादीने लोनची परतफेड रक्कम म्हणून ५ लाख ३ हजार ८५७ इतकी भरलेली होती. तरी देखील त्याला एक अज्ञात व्यक्ती वारंवार लोनची रक्कम भरण्याकरिता संपर्क करत होता. पैसे न भरल्यास त्यांचा चेहरा असलेल्या नग्न फोटो त्यांच्या मित्रांना पाठविण्याची धमकीसुद्धा देत होता.


फिर्यादीची फसवणूक: 2 फेब्रुवारीला फिर्यादीने पैसे भरण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचा चेहरा असलेला नग्न फोटो फिर्यादीच्या मित्रांना पाठवून बदनामी केली. तसेच घेतलेल्या लोनपेक्षा २ लाख १० हजार १५७ अधिक भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.


22 मोबाईल, 17 बॅंक खाते:संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर लो. टि. मार्ग पोलीस ठाण्याचे सायबर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनचा एसडीआर तसेच सीडीआर प्राप्त केला. त्याचे विश्लेषण केले असता त्यांना एसडीआरमधील पत्ता हा मध्य प्रदेशातील आढळला. गुन्ह्यातील आरोपीचे लोकेशन हे बिजापूर, कर्नाटक येथील असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे आरोपीने गुन्हा करण्यासाठी वेगवेगळे २२ मोबाईल सिम कार्ड आणि फसवणूक केलेली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी १७ बँक खात्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले.


आरोपीच्या आवळळ्या मुसक्या: लो. टि. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे तपासी अधिकारी आणि पथकाने प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर नमूद आरोपीचे लोकेशन हे कर्नाटक राज्यात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलीस पथकाने कर्नाटक गाठले; परंतु नमूद आरोपी विविध सिम कार्ड वापरत असल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलीस पथकास अडचण येत होती. तरी देखील पथकाने चिकाटीने पाठपुरावा करून नमूद आरोपी हा बिजापूर येथे असल्याची माहिती प्राप्त केली. यानंतर आरोपीला बिजापूर (राज्य कर्नाटक) येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा:Shani Killer Of Atiq : अतिक आणि अशरफचा मारेकरी सनी 15 वर्षांपासून गेला नाही घरी!

ABOUT THE AUTHOR

...view details