महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लसीकरणाच्या बहाण्याने सायबर चोरांकडून आर्थिक लूट - अनिल देशमुख - anil deshmukh tweet on cyber crime

कोरोना लसीकरणाच्या बहाण्याने सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून त्यांची व्ययक्तीक माहिती मागत आहेत. अशा हल्लेखोरांकडून सावथ राहण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

cyber-crime-likely-to-happen-under-pretext-of-corona-vaccination-said-anil-deshmukh-in-mumbai
कोरोना लसीकरणाच्या बहाण्याने सायबर चोरांकडून आर्थिक लूट - अनिल देशमुख

By

Published : Jan 16, 2021, 3:21 PM IST

मुंबई - कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात ठिक ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून याचा फायदा सायबर हल्ले खोरांकडून घेतला जात आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून राज्यातील नागरिकांना यासंदर्भात सतर्कता बाळगण्यात पाळण्याचे आवाहन केले आहे.

अनिल देशमुखांचे ट्विट

अशी होतेय लूट -

राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबवली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड व इतर वैयक्तिक माहिती घेऊन आर्थिक लूट करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे आवाहन राज्याच्या गृहमंत्र्यांनी केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अशा प्रकारचे फोन कॉल्स आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी, असे आवाहन अनिल देशमुख यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - व्हॉट्सअ‌ॅप बॅकफूटवर, प्रायव्हसी अपडेचा निर्णय पुढं ढकलला

ABOUT THE AUTHOR

...view details