महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सायबर अटॅक? जाणून घ्या काय आहे सत्य - मुंबई वीज पुरवठा सायबर हल्ला शक्यता

सोमवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईमध्ये मोठा पावर कट झाला. त्यामुळे राज्याची राजधानी काही काळ विजेविना होती. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या गुढ झाले आहे.

cyber attack
सायबर हल्ला

By

Published : Oct 15, 2020, 12:42 PM IST

मुंबई -12 ऑक्टोबरला मुंबई शहराची बत्ती गुल झाल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात सायबर अटॅकची शक्यताही नाकारता येत नसल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. सायबर हल्ला करून वीजपुरवठा खंडित होऊ शकतो का? याबाबत ईटीव्ही भारतने सायबर तज्ञांकडून अधिक माहिती घेतली.

हॅकिंगद्वारे वीज पुरवठा खंडीत करता येतो मात्र, प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ

सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सायबर अटॅकचा वापर करता येतो, ही गोष्ट नाकारता येणार नाही. मात्र, यात अनेक तांत्रिक गोष्टी असल्यामुळे ही प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे.

देशात शहरी भागात 'स्कॅडा नेटवर्क'द्वारे होतो वीज पुरवठा -

देशात वेगवेगळ्या पावर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्यूशनसाठी कंपन्या आहेत. त्यांचे रोजचे काम हे खासगी नेटवर्कद्वारे केले जाते. या खासगी नेटवर्कच्या माध्यमातून पॅरामीटर्स मॉनिटरिंग, इलेक्ट्रिकल पॅरामिटर व कंट्रोल पॅरामिटर सारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी स्कॅडा या नेटवर्कचा सध्या वापर केला जात आहे. स्कॅडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अ‌ॅण्ड डेटा अ‌ॅक्विजिशन, ही वायरलेस सिस्टीम आहे. यात मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीद्वारे काम केले जाते. ही कार्यप्रणाली ब्रेक करणे खूपच कठीण असल्याचे अंकुर पुराणिक यांनी सांगितले. केवळ रेडिओ फ्रिक्वेन्सी हॅकिंगच्या संदर्भात पारंगत असलेल्या सायबर हॅकरकडूनच अशाप्रकारची हॅकिंग होऊ शकते.

रशियन हॅकरने केला होता युक्रेनचा वीजपुरवठा खंडित -

2015 साली रशियातील हॅकरकडून युक्रेनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे युक्रेनमध्ये पूर्णपणे ब्लॅक आउट झाला होता. महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा हा मॅन्युअली ऑपरेट केला जातो. मात्र , शहरी भागात होणारा वीजपुरवठा हा रिमोट कंट्रोलने केला जात आहे. स्कॅडा सिस्टम ही रेडिओ फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होत असल्यामुळे कुठल्याही सायबर क्रिमीनलला वीज पुरवठ्यावर हल्ला करणे सोपे नसल्याचे अंकुर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details