मुंबई - ट्रान्स हार्बर प्रकल्पासाठी शिवडी रेल्वे स्थानकालगत सुमारे 1004 झाडे कापण्यासाठी महापालिकेने नोटीस लावली आहे. या वृक्षतोडीला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. यासाठी त्यांनी स्वाक्षरी करून रेल्वे प्रशासन, पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांसह आमदारांना झाडे कापू नये यासाठी पत्र लिहिले आहे.
शिवडी रेल्वे स्थानकालगतची 1004 झाडे तोडण्याची नोटीस; पर्यावरण प्रेमीचा तीव्र विरोध - पर्यावरण प्रेमी रुपेश ढेरंगे
ट्रान्स हार्बर प्रकल्पासाठी शिवडी रेल्वे स्थानकालगत सुमारे 1004 झाडे कापण्यासाठी महापालिकेने नोटीस लावली आहे. या वृक्षतोडीला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. यासाठी त्यांनी स्वाक्षरी करून रेल्वे प्रशासन, पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांसह आमदारांना झाडे कापू नये यासाठी पत्र लिहिले आहे.
![शिवडी रेल्वे स्थानकालगतची 1004 झाडे तोडण्याची नोटीस; पर्यावरण प्रेमीचा तीव्र विरोध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4153297-thumbnail-3x2-mumbai.jpg)
मुंबईत यापूर्वी आरे येथील कार्षेड प्रकल्पासाठी 2200 झाड तोडण्यासाठी परवानगी मागितली गेली होती. परंतु, नागरिकांनी हरकत दर्शवल्यानंतर पालिकेने ही झाडे तोडण्यास स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर, आठ ऑगस्ट रोजी शिवडी स्थानकातील झाडं तोडण्याची सूचना पालिकेने झाडांवर लावली आहे.
नैसर्गिक संपत्ती नष्ट करून आभासी प्रकल्प कशासाठी, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. जर झाडे तोडली गेली किंवा तोडायला आले तर शिवडी येथील स्थानकात रेल्वे रोको आणि पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमी रुपेश ढेरंगे यांनी दिला आहे.