मुंबई :अँधेरी भागात 11 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने (Customs department seized smuggled gold) 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त (seized 61 kg of smuggled gold ) केले आहे. घटनेतील दोन वेगवेगळ्या प्रकरणात सात प्रवाशांना अटक (Seven accused arrested) करण्यात आली आहे. latest news from Mumbai, Mumbai crime
एकाच दिवशी 61 किलो सोनेजप्तीचा रेकॉर्ड -मुंबई एअरपोर्ट कस्टमने एकाच दिवसात 61 किलो सोने जप्त केले आहे. मुंबई विमानतळवर सीमा शुल्क विभागाने शुक्रवारी 11 नोव्हेंबरला ही कारवाई केली. या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 32 कोटी रुपये आहे. सीमा शुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करत सात प्रवाशांना ज्यात 5 पुरुष आणि 2 महिलाना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या इतिहासातील उत्तम कामगिरीपैकी एक मानल्या जात आहे.
पहिला प्रवासी टांझानियातील-पहिल्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने चार भारतीय प्रवासी टांझानियामधून आले होते. त्यांच्याकडून 53 किलो सोने जप्त करण्यात आले असून चार ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी अतिशय हुशारीने सोन्याची तस्करी करत होते. आरोपींनी सोने कमरेच्या पट्ट्यात लपवून ठेवले होते. चौघांकडून 28.17 कोटी रुपयांचे 53 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दोहा विमानतळावर सुदानी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने हे सोने आरोपीला दिले होते. चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुसरा प्रवासी दुबईचा -दुसऱ्या कारवाईत, गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तीन प्रवाशांकडून (एक पुरुष आणि दोन महिला) 3.88 कोटी रुपयांचे 8 किलो सोने जप्त केले आहे. आरोपी दुबईहून विस्तारा कंपनीच्या विमानाने आले होते. त्याने आपल्या जीन्समध्ये मेणाच्या स्वरूपात सोने लपविले होते. तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
एका दिवसातील सर्वांत मोठी कारवाई -एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे, कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 5 पुरुष आणि 2 महिला प्रवाशांचा समावेश आहे.