मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे आरबीआयने येस बँकेवर एका महिन्यासाठी स्थगिती आणली आहे. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यामधून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेवर कर्जाचा एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहेत. याबाबत माहिती मिळताच अनेकांनी एटीएममधून पैसे काढले. यामुळे एटीएममधील रोख संपल्याने अनेक ग्राहकांना पैसे काढता येत नाहीयेत. याबाबत आम्हाला कळविण्यात आले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. होळीच्या सणावर अशाप्रकारे निर्बंध लादल्यामुळे ग्राहक संकटात सापडले असून ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.