महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ग्राहकांची आर्थिक फसवणूक; आरोपीला गुजरातमधून केली अटक

Mumbai Crime News : मुंबईत लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस अहमदाबाद येथून बेड्या ठोकण्यात आल्या आल्याची माहिती, डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे (DB Marg Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिलीय.

Mumbai Crime News
आरोपीला गुजरातमधून केली अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 11:02 PM IST

मुंबई Mumbai Crime News : हॉलिडे पॅकेज बुक (Holiday Packages) करून देण्याच्या बहाण्याने लाखोंची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला, गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. जैनिथ उर्फ अंकित उर्फ गोपाल प्रविणभाई पोपट (वय 35) असं आरोपीचं नाव असून या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

बुकिंगसा घेतले एक लाख 15 हजार 700 : तक्रारदार यांनी एका हॉस्पिटॅलीटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीचं सबस्क्रीप्शन घेतलं होतं. कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीचे नियोजन आणि बुकिंग करते. तक्रारदार यांना नोव्हेंबरमध्ये आपल्या कुटुंबासह केरळ येथे सहलीला जायचे होते. म्हणून त्यांनी या कंपनीच्या एका रजिस्टर मोबाईल नंबर वरती संपर्क साधला. ह्या मोबाईल धारकाने तक्रारदारास बुकिंगसाठी एका वेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं. या मोबाईल धारकाने त्यांना केरळ येथे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, जेवण आणि फिरणे इत्यादीसाठी एक लाख 15 हजार 700 इतक्या रकमेचे पॅकेज देऊ केले. याबाबत मोबाईलवर बोलणारा व्यक्तीने तक्रारदार आणि त्यांची पत्नी यांना व्हाट्सअपद्वारे चॅटिंग करत बुकिंगच्या डिटेल्स पाठवले.

डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: दोन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर यादरम्यान तक्रारदार यांनी मोबाईल क्रमांकावर बोलणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गुगल पेद्वारे एका मोबाईल क्रमांकावर 2000 आणि दुसरा मोबाईल क्रमांकावर एक लाख 15 हजार 700 असे मिळून एक लाख 17 हजार 700 इतकी रक्कम पाठवली. तक्रारदार यांनी पुन्हा आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर ती वारंवार संपर्क साधला असता मोबाईल धारकाने कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदार यांना त्यांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर डी बी मार्ग पोलीस ठाण्यात (DB Marg Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 419 420 आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला अहमदाबाद मधून घेतलं ताब्यात : दाखल गुन्ह्याची दाखल घेत आरोपीच्या शोधात डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक तपास करून, पुण्यातील सोशल मीडियावर जाहिरातीची लिंक पाठवणारा मुख्य आरोपी गोपाल प्रविणभाई पोपट याला अहमदाबाद येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या आरोपी विरोधात गुन्हा केल्याचा सबळ पुरावा पोलिसांना सापडला आहे. या आरोपी विरोधात अशा प्रकारे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. अंगडिया लूट प्रकरण; सहा आरोपींना अटक, पोलिसांनी केले 4 कोटी जप्त
  2. Buldhana Crime: बोरी आडगाव येथे शेतातील घरावर सशस्त्र दरोडा; कुटुंबातील चार जण जखमी
  3. Amravati crime News : एटीएम फोडून 16 लाख रुपये लंपास करणाऱ्या दोघांना अटक, एक हरियाणा तर दुसरा सापडला बैतुलमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details