महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोठी कारवाई! जेएनपीटी बंदरातून तब्बल 300 कोटींचे हेरॉईन जप्त - heroin seized jnpt news

जेएनपीटी बंदरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत टॅल्कम पावडरचा साठा असलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 290 किलो हेरॉईन ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर महसूल संचलनालयाने तरनतारन येथे छापा टाकला. इंपोर्टचे काम करणारे प्रभारी प्रभजीत सिंग यांच्या घरी हा छापा टाकण्यात आला. प्रभजीत सिंग द्वारा पाकिस्तानमधून सिमेंट मागविण्यात आले होते.

heroin seized
हेरॉईन जप्त

By

Published : Jul 3, 2021, 10:24 AM IST

Updated : Jul 3, 2021, 11:29 AM IST

नवी मुंबई (ठाणे) -जेएनपीटी बंदरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत टॅल्कम पावडरचा साठा असलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 290 किलो हेरॉईन ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सीमाशुल्क विभागाची कारवाई -

नवी मुंबई परिसरातील उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी टॅल्कम पावडरचा साठा असलेला कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 290 किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

हेरॉईनची मुंबई दिल्ली परिसरात होणार होती विक्री -

प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्याआधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली

जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे थेट पंजाब कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यानंतर महसूल संचलनालयाने तरनतारन येथे छापा टाकला. इंपोर्टचे काम करणारे प्रभारी प्रभजीत सिंग यांच्या घरी हा छापा टाकण्यात आला. प्रभजीत सिंग द्वारा पाकिस्तानमधून सिमेंट मागविण्यात आले होते. दरम्यान, हेरॉईनच्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे प्रभजीत यांच्या परिवाराने सांगितले आहे. महसूल गुप्तचर संचलनालयाच्या टीमला यांसदर्भात प्रभजीत यांच्या घरुन काहीच मिळाले नाही, असा दावा प्रभजीत यांच्या परिवाराने केला आहे.

हेही वाचा -डिनो मोरियासह संजय खान आणि डीजे अकील यांची ईडीकडून संपत्ती जप्त

Last Updated : Jul 3, 2021, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details