मुंबई - हिंदी बोलण्याच्या वादावरून दादरमध्ये एका कुरियर बॉयने दोन महिलांवर बॉलपेनने हल्ला केला आहे. या हल्ल्यात विनिता पेडणेकर ही महिला जखमी झाली आहे. इब्राहीम शेख असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा बांगलादेशी आहे किंवा पश्चिम बंगालचा आहे याचा तपास पोलीस करत आहे.
दादरमध्ये कुरियर बॉयचा 2 महिलांवर हल्ला; आरोपी ताब्यात - dadar
हिंदी बोलण्याच्या वादावरून दादरमध्ये एका कुरियर बॉयने दोन महिलांवर बॉलपेनने हल्ला केला आहे.
दादरमधल्या केळकर रोडवर आज (शुक्रवार) सकाळी पुस्तकांची डिलिव्हरी द्यायला हा तरूण दादर परिसरात राहणाऱ्या विनिता पेडणेकर आणि सुजाता पेडणेकर यांच्या घरी आला होता. दरम्यान कुरिआर बॉय शेख याला मराठी येत नाही. त्यावरून पेडणेकर आणि त्या तरूणामध्ये वाद झाला. त्यानंतर त्या तरूणाने या दोन्हा महिलांवर हल्ला केला.
या संदर्भात शिवाजी पार्क पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी तो मुंबईत आला आणि फोरम कुरियरमध्ये कामाला लागला होता. दरम्यान कुरियर बॉयच्या हल्ल्यात विनिता पेडणेकर या जखमी झाल्या. आरोपीने त्यांच्या गालावर पेनने हल्ला केला होता. अटक आरोपी हा बांगलादेशी आहे किंवा पश्चिम बंगालचा आहे याचा तपास पोलीस करीत आहे.