मुंबई - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयातील सांस्कृतीक कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सुचना संबंधित खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच महाविद्यालयीन परिक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कोरोना : महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम 25 मार्चपर्यंत स्थगित - मंत्री उदय सामंत - मंत्री उदय सामंत
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयातील सांस्कृतीक कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सुचना संबंधित खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच महाविद्यालयीन परिक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा -कोरोना: १ ली ते ९ पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव, थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी ज्या महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अद्याप झाले नसतील त्यांनी ते कार्यक्रम कोरोना संसर्गामुळे 25 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याच्या सूचना सरकारी खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन परीक्षांबाबत पुढे ढकलाव्यात किंवा काय यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून ठरविण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.