मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील सर्वाधिक स्वच्छ स्थानकाचा मान मिळाला आहे. जल शक्ती, पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयद्वारे हे घोषित करण्यात आले आहे. गॉथिक शैलीतील बांधकाम असलेले हे स्थानक मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील १०० स्वच्छ ठिकाणांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील ३० ठिकाणांना तीन टप्प्यात विभाजित करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १० ठिकाणे घोषित केली होती. यामध्ये वैष्णो देवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज महल, तिरूपती मंदिर, स्वर्ण मंदिर, मणिकर्णिका घाट, अजमेर शरीफ दर्गा, मीनाक्षी मंदिर, कामाख्य मंदिर, जगन्नाथ पुरी या ठिकाणांचा समावेश होता.