मुंबई : क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दरक्रिप्टोकरन्सीचे फायदे :या प्रकारच्या बँकिंगचा मुख्य फायदा क्रिप्टोकरन्सी डेबिट कार्ड हा आहे. या बँकिंगमध्ये डिजिटल चलन इतर कोणत्याही चलनाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी किंवा रोख रक्कम म्हणून काढण्याची परवानगी देतात. अनेक फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपन्या चार्टर्ड बँक किंवा डेबिट कार्डनिर्मिती कर्त्यांसोबत भागीदारी करत आहेत. या भागीदारीद्वारे क्रिप्टोकरन्सीचे रुपांतर डॉलरमध्ये करण्यात येते. अनेक डेबिट कार्ड कंपन्यानी डिजिटल फंड स्वीकारण्यास सुरवात केली आहे. क्रिप्टोकरन्सी बँकिंगद्वारे आपण डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून पैसे वापरू शकतो. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.
रोलर कोस्टर राइड : 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे.