मुंबई : बिटकॉइन, इथेरिअमच्या किंमतीत रविवार ( दि.29 ) घसरण झाली होती. आज सोमवारी तुलनेत दर वाढले आहेत. 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता त्याबद्दल थोडी माहिती समजून घेऊयात.
काय आहे क्रिप्टो चलन :आज बीटकॉइनची किंमत 19,34,759.71 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,33,935.75 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,927.49 रूपये आहे. तिच किंमत काल शनिवारी ( दि. 29 ) रोजी जास्त होती. बीटकॉइनची किंमत 18,84,198.18 होती, तर इथेरिअमची किंमत 1,29,049.63 रूपये होती. बायनान्सची किंमत 25,005.69 रूपये होती. शुक्रवारी ( दि. 28 ) रोजी बिटकॉइनची किंमत 18,86,214.08 रूपये होती, तर इथेरिअमची किंमत 1,30,742.82 होती. बायनान्सची किंमत 21,645 रूपये होती. क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात येते.