मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मुंबईतल्या दादर-माटुंगा परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर रांगा लागल्या आहेत. मोदी यांनी पुढील 21 दिवस देशात संचारबंदीची केल्याची घोषणा केली आहे. जीवनावश्यक दुकाने यातून वगळण्यात आले असली, तरी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातच बुधवारी गुढीपाडवा असल्याने सण घरातल्या-घरात साजरा करण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली आहे.
भारत 'लॉकडाऊन' : मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर नागरिकांची झुंबड - Mumbai latest news
भारत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मंगळवारी रात्री साडेआठनंतर बाजारात गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांनी दूध, किराणा घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
भारत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मंगळवारी रात्री साडेआठनंतर बाजारात गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांनी दूध, किराणा घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गोरेगाव नागरी निवारा येथे महानंदाचे दूध तसेच किराणा आणि मेडिकलमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे.
तर कांदिवली येथील महावीर नगर आणि बोरिवली परिसरात देखील नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. कुर्ला, सायन, घाटकोपर, धारावी, माहीम, सायन, सांताक्रूझ, चेंबूर, साकिनाका, अंधेरी, मरोळ, पवई येथील ज्या बाजारपेठेत दुकाने सुरू होती. तेथे सगळीकडेही हीच परिस्थिती होती.