मुंबई - मुंबईत 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी ज्यांना मोबाइलवर संदेश आला आहे. त्यांनीच लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणाचा संदेश आला नसला तरी केंद्रांवर नागरिक गर्दी करत असल्याचे दिसत आहे.
नोंदणी, मोबाइलवर कन्फर्म संदेश असेल तरच लस
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या वेबसाईट आणि कोविन अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर लसीकरणासाठी मोबाइलवर संदेश येत आहे. या संदेशात लसीकरणाची तारीख आणि वेळ दिली जात असते. असा मोबाइलवर आलेला संदेश घेऊनच लसीकरण केंद्रांवर यावे. ज्या नागरिकांना लसीकरणाचा संदेश आला आहे त्यांनाच लस दिली जात आहे, अशा सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत.