महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एलटीटी'रेल्वे स्थानकात परप्रांतीयांची तुफान गर्दी - Mumbai breaking news

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात टाळेबंदी लागण्याची शक्यता वर्तविण्यात ये आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील परप्रांतीय नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत.

crowd-of-migrant-people-in-ltt-railway-station
गर्दी

By

Published : Apr 10, 2021, 7:07 PM IST

मुंबई -महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 10 एप्रिल) बैठक बोलावली आहे. कोरोनाला आळा बसवण्यासाठी कठोर निर्बंधाची घोषणा होऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री यांनी दिला होता. मुख्यमंत्री याच्या इशाऱ्यानंतर पुन्हा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत मुंबईतील लोकमान्य टिळक स्थानकात परप्रांतीयांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी
सकाळपासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी गर्दी केली होती. गेल्या वर्षी प्रमाणे पुन्हा लॉकडाऊन लागला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल म्हणून आम्हला आमच्या गावी जाऊ द्या, असे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हातामध्ये आणि पाठीवर मोठ्या बॅगा घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दीही करण्यात आली. यूपी, बिहार, राजस्थानला जाणारे अनेक प्रवासी या ठिकाणी होते. एकीकडे उन्हाळ्याच्या सुटीमध्ये दरवर्षी परप्रांतीय मजूर त्याचा गावाकडे जात असतो. त्यामुळे ही स्थानकात गर्दी झाल्याची चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सर्व ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामध्ये आमच्या नोकऱ्या गेल्या. तसेच आमचे दुकाने ही बंद ठेवण्यात आले आहे. हे असेच चालत राहिले तर आम्हला येथे खाण्यासाठी ही पैसे राहणार नाहीत म्हणून आम्ही गावी जात आहोत, असे काही परप्रांतीयांकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details