महाराष्ट्र

maharashtra

खंडणीचा गुन्हा; गँगस्टर प्रसाद पुजारीच्या मावस भावाला अटक

By

Published : Mar 3, 2020, 8:55 PM IST

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरात डिसेंबर 2019 रोजी शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर खंडणीसाठी एका पीडित व्यावसाईकाला धमकविण्यात येत होते. खंडणी दिली नाही तर विक्रोळीत झालेला गोळीबार तुझ्यावर करू, अशी धमकी सुद्धा प्रसाद पुजारी या व्यावसायिकाला देत होता.

आरोपी सुकेश कुमार सुवर्णा
आरोपी सुकेश कुमार सुवर्णा

मुंबई - शहरातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या गँगस्टर प्रसाद पुजारी याचा खास हस्तक असलेल्या मावस भावाला जेरबंद करण्यात आले आहे. सुकेश कुमार सुवर्णा (वय - 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 7 ने केली. कर्नाटक राज्यातील उडपी येथून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

खंडणीचा गुन्हा; गँगस्टर प्रसाद पुजारीच्या मावस भावाला अटक

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरात डिसेंबर 2019 ला शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर खंडणीसाठी एका पीडित व्यावसायिकाला धमकविण्यात येत होते. खंडणी दिली नाही तर विक्रोळीत झालेला गोळीबार तुझ्यावर करू, अशी धमकी सुद्धा प्रसाद पुजारी या व्यावसायिकाला देत होता.

सदर पीडित बांधकाम व्यावसायिकाने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हे शाखा 7 कडून प्रसाद पुजारी गँगच्या हस्तकाला मकोका खाली अटक करण्यात आली.

कर्नाटकमधून हँडल केली जात होती टोळी -

पोलीस तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले, अटक आरोपीच्या बँक खात्यावर मेंगलोर, कींनी गोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून 25 हजार रुपये भरण्यात आले होते. सदरचे हे पैसे खंडणी साठी धमकवण्यात येणाऱ्या कामासाठी देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सुकेश कुमार सुवर्णा (वय - 28) याला अटक करण्यात आली आहे. तसेच हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रसाद पुजारी गँगच्या गुंडांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे पुरवीत होता.

अशा प्रकारे धमकवायचा -

'में सबसे 1 करोड लेता हू , तू मेरे एरिया का है इसलीये तू 10 लाख दे, मालूम है ना विक्रोली मे एक को चॉकलेट दिया था' अशाप्रकारे सुकेश कुमार हा व्यावसायिकांना धमकवायचा.

ABOUT THE AUTHOR

...view details