महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : पतीस वेडसर ठरवून पत्नीने.... वाचा पुढे काय झालं - रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस

पतीला जेवणातून ढोंगीबाबाने दिलेली जडीबुटी खाऊ घालून पत्नीने त्याला वेडसर ठरवून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर संयुक्त बॅंक लॉकरमधून १५ लाख रुपये आणि दोन किलो सोने लंपास केले. मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पतीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पत्नीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai Crime
पत्नीने लंपास केले 2 किलो सोने

By

Published : Aug 7, 2023, 10:42 PM IST

मुंबई:पत्नीने तिचा भाऊ आणि बहिणीच्या मदतीने पतीस वेडसर ठरवून हत्येचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या बँक खात्यातील १५ लाख रुपये आणि लॉकरमधील दोन किलो सोने लंपास केल्याचा खळबळजनक आरोप पतीने करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी आरोपी पत्नीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पतीला ढोंगीबाबाने दिलेली जडीबुटी खायला दिली:दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात राहत असलेल्या ५६ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक यांनी रफी रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीनुसार, २०१८ ते २०२० या काळात वडाळा येथील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. पत्नीने धमकावत त्यांना जेवणातून ढोंगीबाबाने दिलेली जडीबुटी खायला दिली. नंतर तिने तक्रारदार असलेल्या पतीस वेडे ठरवण्याचा आणि हत्येचा प्रयत्न केला. तसेच, पत्नीने तक्रारदार यांच्यासोबत असलेल्या संयुक्त बँक खात्यातील दोन किलो सोने काढून घेतले. तसेच घरातील १५ लाखांची रोख रक्कम थोडी थोडी चोरी करून आपल्या भावाला म्हणजेच तक्रारदार यांच्या मेहुण्याला दिली.

न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रार दाखल:तक्रारदार व्यावसायिक यांनी भोईवाडा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी तक्रारदार यांची फिर्याद नोंदवून घेत पत्नीसह तिचा भाऊ आणि बहिणी विरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.


सोने आणि रकमेबाबत चौकशी सुरू:याप्रकरणी पतीच्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरू असल्याचे रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले आहे. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदवत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित बँक खात्यातील सोने आणि रकमेबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. पतीची प्रकृती सध्या स्थिर असून या प्रकरणाची सखोल तपास केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा:

  1. Gang Rape For 28 Days : धक्कादायक! 13 वर्षीय मुलीला सहा जणांनी 28 दिवस ओरबाडले
  2. Shailaja Darade Arrest : परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अटक; नोकरीचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक
  3. Crime News : चोरीसाठी तरुणाला 'तालिबानी शिक्षा', बेदम मारहाण, कपडे फाडून केले मुंडन

ABOUT THE AUTHOR

...view details