मुंबई: सपना कोर्टात म्हणाली की, आम्ही त्याला थांबवत होतो पण तो मला मारत होता. पृथ्वी शॉच्या बाजूने 8-9 लोक होते आणि आम्ही फक्त दोनच लोक होतो. आम्ही प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. आम्ही पृथ्वी शॉ याला 50 हजार रुपये मागितल्याची बाब खोटी आहे. पृथ्वी शॉसुद्धा त्या हॉटेलमध्ये पार्टीला आला होता. त्याने मद्य प्राशन केले होते. पृथ्वी शॉ खूप मद्यधुंद होता. तो पोलीस ठाण्यात गेला तेव्हा त्याला पकडले जाण्याची भीती होती. याप्रकरणी अद्याप ७ आरोपींना अटक व्हायची असल्याचे पोलिसांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. त्याआधारे पोलिसांनी तीन दिवसांची कोठडी मागितली आहे.
शॉला धमकावत असल्याचा जबाब: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत झालेल्या झटापटीत आता पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे आणि आरोपींची चौकशी केली जात आहे. ओशिवरा पोलिसांनी पुन्हा एकदा क्रिकेटर पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव याचा जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये यादवने पोलिसांना सांगितले आहे की, सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ते लोक पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राला सतत धमकावत होते.
जीवे मारण्याची धमकी: आरोपींनी सांगितले होते की, हाणामारीत दरम्यान आपण फक्त कार फोडली. पृथ्वी शॉच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलीस या एफआयआरमध्ये आयपीसी कलम 387 जोडत आहेत. न्यायालयात अर्ज दाखल करून आणखी एक कलम जोडण्याचे आवाहन पोलीस करणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आरोपींवरील पेच अधिक मजबूत होईल. व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ हा सपना गिल नावाच्या महिलेसोबत भांडताना दिसत आहे. वास्तविक, पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेताना हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सपना गिल आणि मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या वादात सपना गिलसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?तक्रारदार व्यावसायिक हा 16 फेब्रुवारी, 2023 रोजी त्याचा मित्र क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबत सहारा स्टार हॉटेल मेन्शन क्लब डोमेस्टीक विमानतळ सांताक्रुझ येथे गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढल्यानंतर पुन्हा सेल्फी काढण्यास दोघांनी आग्रह केल्याने हॉटेल मॅनेजरने दोन्ही आरोपींना हॉटेलबाहेर काढले. याचा राग मनात धरून आरोपींनी पृथ्वी शॉची गाडी जोगेश्वरीच्या लोटस पेट्रोल पंप समोर, लिंक रोड येथे अडवली. आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी तक्रारदाराची गाडी बेसबॉल स्टीकने फोडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:Political leader Reaction on Shiv Sena: शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; काय म्हणत आहेत राजकीय नेते