महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बधाई हो टीम इंडिया म्हणत, विराट कोहलीच्या चाहत्याने चक्क पक्षाच्या पंखावर कोरला 'विराट' चेहरा... - चक्क पक्षाच्या पंखावर कोरला विराट चेहरा

Cricket World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांच्या शानदार कामगिरीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 117 धावांची इनिंग खेळून वनडेतील अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वे शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या या फटकेबाजीवर त्याचे चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. अशाच एका मुंबईतील चहा त्याने चक्क विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे पक्षाच्या पिसावर चित्र कोरले आहे.

Cricket World Cup 2023
चक्क पक्षाच्या पंखावर कोरला विराट चेहरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 11:05 PM IST

चक्क पक्षाच्या पंखावर कोरला विराट चेहरा

मुंबईCricket World Cup 2023 :मुंबईतील या क्रिकेट वेड्या चहात्याचं नाव आहे निलेश चव्हाण. निलेश चव्हाण हे मुंबईत राहणारे एक फिदर आर्टिस्ट असून, ते क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आहेत. त्यात विराट कोहलीच शतक आणि भारतीय संघाने केलेली घोडदौड याचा मेळ घालत निलेशने पंखांवर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा चेहरा साकारला आहे. आपण आतापर्यंत सर्व मॅच जिंकत आलो आहोत. आता प्रतीक्षा फक्त अंतिम सामन्याची आहे. मला आशा आहे कर्णधार रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली आपण जसे आतापर्यंतचे सर्व सामने जिंकलो तसाच अंतिम सामना देखील आपणच जिंकू. अशी प्रतिक्रिया निलेश चव्हाण यांनी दिली आहे.

टीम इंडियाला शुभेच्छा: निलेश चव्हाण हे मुंबईतील विक्रोळी येथे राहतात. निलेश यांनी पक्षांच्या तीन पंखांवर विराट कोहली, रोहित शर्मा आणि वर्ल्ड कपचे चित्र साकारले आहे. अर्जिकल ब्लेडच्या सहाय्याने बारीक कट देऊन तीन पंखांवर या तीन कलाकृती निलेश यांनी साकारल्या आहेत. अश्या अनोख्या पद्धतीने अशा अनोख्या पद्धतीने निलेश चव्हाण यांनी टीम इंडियाला शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिल्याने ते सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरले आहेत.

आवडीचा आणि कलेचा पर्यावरणाला त्रास नाही : निलेश चव्हाण हे पक्षांच्या पंखावर आपली कलाकृती साकारतात. मात्र, हे पंख ते कुठून आणतात? यात निसर्गाची किंवा त्या मुक्या पक्षाची जीवित हानी होते का? असा प्रश्न विचारला असता निलेश चव्हाण यांनी सांगितलं की, जसं जसं वातावरण बदलत असतं तसतसे पक्षांच्या शरीरात काही बदल होत असतात. काही पक्षी असे असतात ज्यांची पंख गळून पडतात. हेच पंख घेऊन मी त्यावर माझी कलाकृती साकारतो. आज बाजारात देखील पक्षांचे पंख उपलब्ध होतात. त्यामुळे माझ्या आवडीचा आणि कलेचा पर्यावरणाला किंवा जैवविविधतेला कोणताही त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.

हेही वाचा -

  1. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय, भारताशी अंतिम सामन्यात गाठ
  2. Legends League T20 Cricket 2023 : जुने दिग्गज पुन्हा उतरणार मैदानात; लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा 'या' तारखेपासून होणार सुरू, केणत्या शहरांत होणार सामने?
  3. Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : ऑस्ट्रलिया की दक्षिण आफ्रिका? दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोलकाताच्या 'ईडन'वर कोणाचं 'दिल' होणार 'गार्डन'

ABOUT THE AUTHOR

...view details