महाराष्ट्र

maharashtra

Tunisha Sharma Funeral : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर मीरारोडच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; आरोपीची आई व बहीण उपस्थित

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ( Tunisha Sharma Funeral ) करण्यात आले. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. मीरारोडच्या गोड देव नाका येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार ( tunisha sharma Funeral at mira road crematorium ) करण्यात आले. तिच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी टीव्ही जगतातील अनेक कलाकार देखील उपस्थित होते.

By

Published : Dec 27, 2022, 4:08 PM IST

Published : Dec 27, 2022, 4:08 PM IST

Updated : Dec 27, 2022, 7:10 PM IST

Tunisha Sharma
तुनीषा शर्मा

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर मीरारोडच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

मुंबई (मिरा भाईंदर ) : टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल तुनिषाचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला होता. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास तुनिषाचा मृतदेह भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. त्यानंतर आज दुपारी अडीच वाजता तिचा मृतदेह पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून राहत्या घरी नेण्यासाठी हलविण्यात आला आहे. यानंतर मीरारोडच्या गोड देव नाका येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार ( cremation of tunisha sharma at mira road crematorium ) करण्यात आले.

अभिनेत्री तुनीषा शर्माच्या पार्थिवावर मीरारोडच्या गोड देव नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

तनुषाच्या आईला आली चक्कर : टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या पार्थिवावर मीरारोड येथील तिच्या राहत्या घराजवळ असलेल्या गोड देव नाका येथील स्मशानभूमीत आज 4:30 वा सुमारास हा अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी तनुषाची आई वनिता शर्मा यांची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने त्यांना चक्कर आली. यावेळी आजूबाजूला असलेल्या तिच्या नातेवाईकांनी त्यांना सावरले. तुनिषा शर्माच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी टीव्ही श्रुष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती राहून अंतिम दर्शन घेतले.

आरोपीची आई व बहिण उपस्थित : तुनीषा शर्माच्या अंत्यसंस्कारासाठी आरोपी शीझान खानची बहीण आणि आई मीरा रोड परिसरातील स्मशानभूमीत उपस्थित होते. आरोपी शीझान खानला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून तुनीषा शर्मा आत्महत्याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

मालिकेच्या सेटवरच आत्महत्या :टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर ( शनिवार ) एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले होते. अली बाबा: दास्तान-ए-काबुल टीव्ही मालिकेच्या सेटवरच ही आत्महत्या झाल्याची वालीव पोलीसांनी माहिती दिली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ठ :सध्या तुनिषा शर्मा ( TV actress Tunisha Sharma ) सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती. सब टीव्हीच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये शेहजादी मरियमची ती भूमिका साकारत होती. तनुषाचे वय अवघे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Tunisha Sharma Suicide Case )

का झाले होते ब्रेकअप : सध्या श्रध्दा खून प्रकरणानंतर देशात सुरू असलेल्या वातावरणामुळे झिशान तणावात होता, त्यामुळे त्याने वयाचा दाखला देत, तू लहान असल्याचे सांगून आपण मुस्लिम आणि तू हिंदू मुलगी असल्याचे तुनिषाला सांगितले. झिशानने वय आणि धर्माचे कारण देत आरोपीने लग्नास नकार देत ब्रेकअप केले. तुनिषा शर्माने (२१) शनिवारी दुपारी वसईतील एका स्टुडियोत आत्महत्या केली. तुनिशाचे मालिकेतील सहकलाकार मोहम्मद झिशान (२७) याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. झिशानने प्रेमसंबंध तोडल्यानेच तुनिशाने आत्महत्या केल्याची तक्रार तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी केली होती. या तक्रारीनंतर वालीव पोलिसांनी झिशान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

तनुषाची कारकीर्द :तिने 2015 मध्ये सोनी टीव्हीच्या भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप यातून बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर कलर्स टीव्हीच्या चक्रवर्ती अशोक सम्राटमध्ये झळकली. 2016 मध्ये, तिने फितूर आणि बार बार देखो मधील कतरिना कैफची लहानपणीचीची भूमिका केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवली. नंतर 2018 मध्ये, तिने कलर्स टीव्हीच्या इंटरनेट वाला लव्हमध्ये शिविन नारंगसोबत तिने पहिली मुख्य भूमिका केली. शोमधील शिवीनसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तसेच इंटरनेट वाला लव्ह 2019 मध्ये बंद झाली. नंतर, तिने इश्क सुभान अल्लाह, हिरो - गयाब मोड ऑन, आणि अली बाबा: दास्तान-ए-काबुल सारखे लोकप्रिय शो केले. अनेक म्युझिक व्हिडीओव्यतिरिक्त, तुनिशा विद्या बालनच्या कहानी 2: दुर्गा राणी सिंग आणि सलमान खानच्या दबंग 3 मध्ये देखील दिसली होती.

Last Updated : Dec 27, 2022, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details