महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी कृती आराखडा तयार करा- नाना पटोले - maharashtra rajya sahkari sangh

सहकाराच्या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी निश्चित आराखडा तयार करावा व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित संस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने सर्व उपाय करण्यात यावेत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

सहकार क्षेत्र कृती आराखडा
सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी

By

Published : Oct 22, 2020, 7:40 AM IST

मुंबई- महाराष्ट्रातील सहकार चळवळीने तळागाळातील लोकांना ताकद देण्याचे कार्य केले आहे. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' हा सहकाराचा मूलमंत्र यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. सहकाराच्या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी निश्चित आराखडा तयार करावा व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित संस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने सर्व उपाय करण्यात यावेत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित यांच्या विविध मागण्यांबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष रामदास मोरे, सहकार आयुक्त अनिल कवडे, सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी सहकार क्षेत्रातील अडचणी मांडल्या. ही संस्था राज्यात सहकार प्रशिक्षण, प्रचार, प्रसिध्दी व संशोधनाचे काम करते. प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दयावा, कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी त्यांनी मांडल्या. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी सहकारी संस्था पुनरुज्जीवीत करण्याची मागणी मोरे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details