मुंबईसंपूर्ण देशासह महाराष्ट्रात तसेच मुंबईत मोठ्या उत्साहात Ganeshotsav 2022 साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच 'गणेशचित्र शाळेत' Ganesh Chitra Shala कारागीर, मूर्तिकार गणेश मूर्तीं बनवण्यात मग्न झालेले दिसत आहेत. वास्तविक पाहता यावर्षी मुंबईमध्ये गणेश मूर्तीवरील निर्बंध हटविले आहे. तरीसुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांना गणेश मूर्ती सोपवणे, हे आव्हान मूर्तिकारांसमोर Sculptor from Mumbai आहे. आणि या कमी दिवसाच्या कालावधीत मूर्ती घडवण्यासाठी उत्तर भारतीय North Indian artisans कारागिरांची Craftsmanship of North Indian artisans लाख मोलाची मदत त्यांना होतांना दिसत आहे. मुंबईतील मूर्तिकार Sculptor from Mumbai राजू शिंदे यांच्या गणेश चित्र शाळेतून याचाच आढावा घेतला आहे, ईटिव्हीच्या मुंबई येथील प्रतिनिधीने.
या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. व त्या अगोदर गणेश भक्तांना, त्यांच्या आवडत्या विविध रूपांतील गणपतीच्या मुर्त्या देण्याचे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. अशातच करोनामुळे मागील दोन वर्षांपासून असलेले गणेश मूर्तीवरील निर्बंध यंदा हटवण्यात आले आहेत. ही सर्व गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब असली तरी; या मुर्त्या बनवण्यासाठी फारच कमी कालावधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. विशेष करून सार्वजनिक गणेश मूर्तींच्या उंचीवर यंदा निर्बंध नसल्याने, या मुर्त्या ८ फुटापासून २२ फुटांपर्यंत उंचच उंच घडविण्यात येत आहेत. मुंबईतील परळ येथील मूर्तिकार राजू शिंदे यांच्या 'गणेश चित्र शाळेत' सुद्धा या मुर्त्या घडवण्याचे काम जोमाने सुरू आहे. विशेष करून यंदा सरकारने फार उशिरा निर्बंध हटवण्याची घोषणा केल्याने, मूर्तीकारांकडे या मुर्त्या बनवण्यासाठी फारच कमी कालावधी उरला आहे. त्याचबरोबर मे महिन्यापर्यंत उत्तर भारतीय कारागीर हे कामासाठी मुंबईत गणेश चित्र शाळेमध्ये दाखल होतात. परंतु यंदा अद्याप मोठ्या प्रमाणामध्ये कारागीर उपलब्ध नसले तरीसुद्धा, आता जे उपलब्ध कारागीर आहेत त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचे मूर्तिकार राजू शिंदे यांनी सांगितले.