मुंबई: Jumbo Covid Center Case : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) अटक व्यावसायिक सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि दहिसर कोविड सेंटरचे डीन डॉ. किशोर बिसुरे, डॉ. हेमंत गुप्ता, डॉ. संजय शहा आणि डॉ. अरविंद सिंग या पाटकर यांच्या चार साथीदार यांच्याविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतील जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यात आणि कंत्राट मिळवण्यात कथित अनियमितता प्रकरणात पाटकर यांनी हेमंत गुप्ता आणि संजय शहा यांच्यासमवेत 26 जून 2020 ला लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची स्थापना केली.
मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी करार: आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुजित पाटकर यांच्या फर्मला नोटरीकृत केलं गेलं नाही आणि भागीदारी करार खोटा आहे. हे जाणून, फसवणूक आणि अप्रामाणिकपणे आर्थिक नुकसान भरपाई मिळविण्याच्या उद्देशानं वापर केला. कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी करार करुन काम केलं, असं आरोपपत्रात नमूद आहे. मात्र संबंधित पाटकर यांच्या कंपनीला अनुभव नव्हता, तरीदेखील महापालिकेनं कंत्राट दिलं होतं, असा आरोप करणयात आला आहे.
आरोपींनी बनावट भागीदारी करार केला: महापालिकेनं निधीचा गैरवापर केला आणि सरकारी तिजोरीचे 15.31 कोटी रुपयांचे नुकसान केलं असं आरोपपत्रात नमूद आहे. पाटकर यांच्यावर चार डॉक्टरांशी संगनमत करुन वरळी आणि दहिसर येथील एनएससीआय येथील जंबो कोविड सेंटरचं कंत्राट घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणानं पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या सेवा बंद केल्याची वस्तुस्थिती लपवून ठेवल्याचा आरोप आहे. यापूर्वी पोलिसांनी राजीव साळुंके आणि सुनील कदम या दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. हे कंत्राट मिळवताना आरोपींनी बनावट भागीदारी करार केला होता.
आरोपपत्र दाखल : याबाबत जाहिरात 22 जून 2020 ला प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर अटक आरोपींनी 26 जून 2020 ला मनुष्यबळ मिळवण्यासाठी भागीदारी डीड केली होती. घाईघाईनं भागीदारी डीड चुकीच्या पद्धतीनं अंमलात आणली गेली होती, असं त्यात म्हटलं आहे. आरोपपत्रात, EOW नं गुन्हेगारी कट केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाची कलमं जोडली आहेत.
हेही वाचा -
- Covid Center Contract Case : जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटणकरांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - सोमय्या
- Mumbai Session Court Order: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; तुरुंगात सुजित पाटकरांना ऑर्थोबेड उपलब्ध करा; सत्र न्यायालयाचे आदेश