महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Masks Instructions: कोरोनाचे प्रमाण वाढूनही मुंबई पालिका आयुक्तांच्या मास्क घालण्याच्या निर्देशांकडे रुग्णालयांसह कार्यालयांचे दुर्लक्ष - मास्क का वापरत नाही

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने पालिका आयुक्तांनी रुग्णालयात, पालिका कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मास्क लावण्याचे निर्देश दिले आहे. मात्र पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाकडे रुग्णालयांनी तसेच पालिका कार्यालयांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. दरम्यान रुग्णालयात मास्क का वापरले जात नाही, याबाबत विचारले असता रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

masks Instructions
मास्क घालण्याच्या निर्देशांकडे दुर्लक्ष

By

Published : Apr 14, 2023, 9:02 AM IST

मुंबई :मुंबईत मार्चपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी तीन वर्षापूर्वी मास्क सक्ती करण्यात आली होती. मास्कचा वापर अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने मागील वर्षी मास्क सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला. यामुळे नागरिकांनी मास्क लावणे बंद केले आहे. आता पुन्हा एकदा कोरोना प्रसार वाढू लागला आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी रुग्णालये आणि कार्यालयात मास्क घालावे, असे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत ६० वर्षावरील नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी सुद्धा मास्क वापरावे, असे आवाहन केले आहे.


रुग्णालयात मास्ककडे दुर्लक्ष :पालिका आयुक्तांनी रुग्णालयात आणि कार्यालयात मास्क लावण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयात पाहणी केली असता बहुसंख्य रुग्ण आणि नागरिक मास्क घालत नसल्याचे दिसून आले आहे. पालिका कार्यालयात तसेच मुख्यालयातही पालिका कर्मचारी मास्क घालत नसल्याचे समोर आले आहे. पालिका प्रशासनाने परिपत्रक काढल्यावर कार्यालयांमध्ये मास्क लावण्याची सक्ती केली जाणार आहे. तर रुग्णालयांमध्ये मास्क का वापरत नाही, यावर रुग्णालयांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.


नेमका कोणता मास्क वापरावा :कोविड-19 आणि एच3एन2 ला प्रतिबंध घालण्यासाठी एन95 किंवा केएन95 हे मास्क विषाणूपासून संरक्षण देतात. त्याचप्रमाणे रोजच्या वापरासाठी कापडी मास्क परिधान करण्यास आरामदायक आणि परवडणारे असतात. ते एन95 किंवा केएन95 सारखी सुरक्षा देत नसले तरी तोंडातील आणि नाकातून बाहेर पडणाऱ्या थेंबांना अडकून ठेवतात. तीन-स्तरीय कापडी मास्क चांगल्या प्रकारचे संरक्षण देतात. संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी कापडी मास्क सर्वोत्तम पर्याय आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्क अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मास्क वापरले पाहिजे.



हेही वाचा : Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या १११५ रुग्णांची तर ९ मृत्यूंची नोंद; मास्क लावण्याचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details