महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात विकेंद्रित पद्धतीने कोविड केंद्र उभारण्यात यावीत - फडणवीस - विकेंद्रित कोविड केंद्रांची मागणी

मुख्यमंत्र्यांशी कोरोना केंद्रांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जम्बो कोरोना केंद्र व्यवस्थापनासाठी कठीण असतात. त्याऐवजी विकेंद्रित पद्धतीने कोविड केंद्र उभारली तर त्याचे व्यवस्थापन सोपे होते. अशी केंद्र नागपुरात होणे गरजेचे आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 17, 2020, 12:19 AM IST

मुंबई - कोरोना रुग्णांसाठी नागपुरात विकेंद्रित पद्धतीने कोविड केंद्र उभारण्यात यावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्ताने आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या बैठकीनंतर नागपूरसंदर्भात त्यांनी ही मागणी केली. नागपुरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत आहे. तातडीने कोविड केंद्रांची उभारणी करणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेने कोविड केंद्रांसंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, त्याला अद्याप मंजुरी प्रदान करण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयानेसुद्धा या स्थितीची दखल घेतली असून, त्यासंदर्भात काही आदेश दिले आहेत.

हेही वाचा -मराठा समाजाचे आरक्षण पुन्हा बहाल झाले पाहिजे- देवेंद्र फडणवीस

जम्बो कोरोना केंद्र व्यवस्थापनासाठी कठीण असतात. त्याऐवजी विकेंद्रित पद्धतीने ही कोविड केंद्र उभारली तर त्याचे व्यवस्थापन सोपे होते. या केंद्रांसाठी तत्काळ आर्थिक मदतसुद्धा देण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी तत्काळ राज्याच्या मुख्य सचिवांना यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता नागपुरात लवकरच विकेंद्रित पद्धतीने किमान हजार खाटा उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा -राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details