मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या मुंबईत गेल्या दोन दिवसात कमी झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 87 रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांचा आकडा 2509 वर तर मृतांचा आकडा 125 वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे 87 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू ; रुग्णांची एकूण संख्या 2509 - mumbai corona update
गेल्या 24 तासात मुंबईत 87 रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांचा आकडा 2509 वर तर मृतांचा आकडा 125 वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत झालेल्या 4 मृतांपैकी 3 रुग्णांना इतर दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 42 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत असे 146 विभाग कंटेन्मेंट एरिया म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. गेल्या 20 दिवसात त्यात वाढ झाली असून प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा 452 वर पोहचला आहे.
मुंबईत 5 एप्रिलपासून आढळून आलेल्या विभागात म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अति आणि कमी जोखमीच्या 57 हजार 700 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 368 व्यक्तींनी 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. मुंबईत आतापर्यंत 38 हजार 990 इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.