मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज रविवारी मुंबईत 28 हजार 015 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत मुंबईत एकूण 13 लाख 58 हजार 588 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत रविवारी 28 हजार 15 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 27 हजार 174 लाभार्थ्यांना पहिला तर 841 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 13 लाख 58 हजार 588 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 11 लाख 97 हजार 864 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 60 हजार 724 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 53 हजार 111 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 64 हजार 280 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 95 हजार 434 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 2 लाख 45 हजार 763 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर रविवारी 15 हजार 567 तर आतापर्यंत 8 लाख 89 हजार 773 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर रविवारी 2 हजार 125 लाभार्थ्यांना तर एकूण 78 हजार 907 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर रविवारी 10 हजार 323 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 3 लाख 89 हजार 908 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2 लाख 53 हजार 111
फ्रंटलाईन वर्कर - 2 लाख 64 हजार 280
जेष्ठ नागरिक - 5 लाख 95 हजार 434
45 ते 59 वय - 2 लाख 45 हजार 763
एकूण - 13 लाख 58 हजार 588
हेही वाचा -पुन्हा लॉकडाऊन केल्यास लाखो अकुशल कामगारांचा रोजगार बुडेल - आहार संघटना
मुंबईत रविवारी 28 हजार 15 लाभार्थ्यांचे लसीकरण - corona vaccination center in mumbai
रविवारी मुंबईत 28 हजार 015 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत मुंबईत एकूण 13 लाख 58 हजार 588 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
मुंबईत रविवारी 28 हजार 15 लाभार्थ्यांचे लसीकरण