नवी मुंबई -पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे, आतापर्यंत पनवेलमध्ये ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
पनवेलमध्ये आतापर्यंत ६९९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर, अजूनही ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. २३ जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या ५४ - COVID 19 cases in Mumbai
पनवेलमध्ये आत्तापर्यंत ६९९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर, अजूनही ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. २३ जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.
![पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या ५४ covid-19-cases-in-panvel-is-rises-to-54](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6970508-335-6970508-1588054920947.jpg)
सद्यस्थितीत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात १८ जण उपचार घेत आहेत. मंगळवारी नवीन पनवेल सेक्टर १३ येथील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहेत. ते मानखुर्द येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दररोज पनवेल ते मानखुर्द असा बस प्रवास आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान इतरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.
तसेच खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर व केंद्रीय सुरक्षा बलाचा एक जवान असे दोन कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्याची सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्यांना मंगळवारी हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले आहे.