महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम टोळीला गुटखा कारखान्यासाठी मदत, न्यायालयाने 3 आरोपींना ठोठावली 10 वर्षाची शिक्षा - कराचीमध्ये गुटखा कारखाना

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim Gang ) याच्या टोळीला कराचीत गुटखा कंपनी सुरू करण्यासाठी मदत केल्यामुळे विशेष मकोका न्यायालयाने 3 आरोपींना 10 वर्षाची शिक्षा ( Court Sentence 3 Accused to 10 Year Punishment ) सुनावली. जे एम जोशी, जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख मन्सुरी असे त्या आरोपींची नावे आहेत. तर रसिकलाल धारिवाल यांचा मृत्यू झाला आहे. रसिकलाल धारिवाल आणि जे एम जोशी यांच्यातील वाद सोडवण्यासाठी दाऊद टोळीकडे ( Dawood Ibrahim Gang Gutkha Company At Karachi ) गेला होता. त्यानंतर गुटखा किंग असलेल्या या आरोपींनी दाऊदला मदत केली.

Dawood Ibrahim Run Gutkha Company
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

By

Published : Jan 9, 2023, 6:53 PM IST

Updated : Jan 9, 2023, 8:14 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीला ( Dawood Ibrahim Gang ) कराचीमध्ये गुटखा कारखाना ( Court Sentence 3 Accused to 10 Year Punishment ) सुरू करण्यासाठी मदत केल्याप्रकरणात तीन आरोपींना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुटखा व्यवसायिक ( Dawood Ibrahim Gang Gutkha Company At Karachi ) जे एम जोशी, जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख मन्सुरी असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायाधीश बी डी शेळके यांनी याबाबतचा निर्णय दिला.

प्रदीप घरत

कराचीत सुरू करायचा होता गुटखा कारखानापाकिस्तानमधील कराचीत दाऊद इब्राहिमच्या टोळीला गुटखा कारखाना ( Dawood Ibrahim Gang Start Gutkha Company At Karachi ) सुरू करण्यासाठी मदत केली गेली होती. या प्रकरणी तीन आरोपींना दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये गुटखा व्यावसायिक जे एम जोशी, जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख मन्सुरी यांचा समावेश आहे. विशेष मकोका न्यायाधीश बी डी शेळके यांनी शिक्षेची सुनावणी केली. गुटखा व्यावसायिक जे एम जोशी आणि रसिकलाल धारिवाल ( Gutkha King Rasiklal Dhariwal ) यांनी दाऊदला मदत केल्याचे सिद्ध झाले आहे. यातील जोशी आणि सहआरोपी असलेल्या रसिकलाल धारिवाल यांच्यात आर्थिक वाद झाल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. दरम्यान ट्रायलच्या कालावधीत सहआरोपी धारिवाल यांचा मृत्यू झाला.

गुटखा इंडस्ट्रीतील किंग व्यावसाईकांमध्ये वाददाऊद इब्राइम टोळीने 2002 मध्ये पाकिस्तानमध्ये गुटखा व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोपींची मदत घेतली होती. धारीवाल हे आरएमडी गुटखा बनवायचे तर जोशींच्या कंपनीचे नाव गोवा गुटखा होते. गुटखा उद्योगातील धारिवाल आणि जोशी ( Gutkha King J M Joshi ) ही दोन मोठी नावे होती, या दोघांनाही गुटखा उद्योगात किंग मानले जात होते. सुरुवातीला जगदीश जोशी आरएमडी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र कालांतराने त्याने स्वत:ची गोवा नावाची गुटखा कंपनी काढली. त्यानंतर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. दोघांमधील वादाची माहिती दाऊदला ( Dawood Ibrahim Gang Gutkha Company ) समजली. यावर तोडगा काढण्यासाठी जोशीकडून गुटखा बनवण्याचे तंत्रज्ञान आणि माहिती दाऊद टोळीने ( Dawood Ibrahim Gang ) घेतली. यानंतर मुंबईतून 15 गुटखा मॅन्युफॅक्चरिंग मशिन्स आणि पाऊच तयार करणारी मशिन्स दुबाईला आणि तिथून कराचीत पाठवण्यात आली होती.

Last Updated : Jan 9, 2023, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details