मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्थे(सीआयडी)ने सोमवारी (दि. 8) अटक केली होती. आरोपी नंदकिशोर गोपाळे आणि आशा कोरखे, असे त्या दोघांची नावे असून त्यांच्या मंगळवारी (दि. 9) किल्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
माहिती देताना सरकारी वकील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माहिती देताना संशयितांचे विधीज्ञ काय आहे प्रकरण..?
गुन्हे मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरखे या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना काल (सोमवारी) अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष 9 मध्ये कार्यरत होते.
श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यामध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण महाराष्ट्र सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.
ठाण्यातील बिल्डर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त अकबर पठाणसह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरखे यांना सोमवारी अटक झाली होती. त्यांना आज न्यायलयात हजर केले असता दोघांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा -ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये कसे भिजलेत? हे फडणीसांनी दाखवून दिलं - अशिष शेलार