मुंबई- महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुले मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश - उपमुख्यमंत्री अजित पवार
विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. तर या निकालामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपला मोठा धक्का दिला आहे. तर या निकालामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या आदेशानुसारच हे सरकार स्थापन करण्यात आले असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरुपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.