मुंबई: रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र (Emergency medical facilities) सुरु करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने २६ मार्च २००९ ला रेल्वेला आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने ही देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्काली वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले होते. यांची जवाबदारी खासगी हॉस्पिटल आणि ओषध निर्माण कंपन्या दिली आहे.
यातील अनेक आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांची परिस्थिती अत्यंत्य वाईट आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले आहे. मात्र, ही सुविधा प्रवाशांसाठी ठराविक वेळेतच मिळते. रात्री आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद (Railway emergency medical room closed at night) असल्याचे निदर्शनात आले. याबाबद सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत झवेरी यांनी न्यायालयाचे आदेशांचे पालन करण्याचे विनंती केली आहे.