महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाळीव मांजरीची छळ करून हत्या; न्यायालयाने ठोठावला 'इतका' दंड

चेंबूर परिसरात मागील वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत ठार मारले होते आणि त्याचे काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस 9 हजार 150 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालय

By

Published : Oct 9, 2019, 11:32 PM IST

मुंबई - चेंबूर परिसरात मागील वर्षी एका इसमाने पाळीव मांजरीचा छळ करत काही फोटो समाजमाध्यमावर टाकले होते. याप्रकरणी प्राणी मित्राच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्या व्यक्तीस 9 हजार 150 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चेंबूरच्या वाशिनाका परिसरातील इंदिरा नगर भागात 14 मे, 2018 ला संजय गाडे यांनी पाळीव मांजरीला स्क्रूड्राईव्हरने भोसकून त्यानंतर त्या मांजरीला उंच ठिकाणी लटकावलेला फोटो समाज माध्यमांवर पसरवला होता. यानंतर स्थानिकांनी आणि प्राणी मित्रांनी पोलिसात धाव घेऊन संजय गाडे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देत दिली होती. त्यावरून गाडेविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - राज्यात सत्ता परिवर्तन होईल असे मला वाटते - नवाब मलिक

त्या गुन्हावरून न्यायालयात खटला दाखल झाला होता. आरोपीतर्फे वकिलांनी न्यायालयाना विनंती अर्ज केला होता. यात आरोपीच्या वकिलाने म्हटले होते, आरोपीला गुन्हा मान्य असून आरोपी हा मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या कमजोर आहे. त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, आरोपी संजय हा दिव्यांग आणि मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने न्यायालयाने त्यावरील विविध गुन्ह्यात 9 हजार 150 रुपये दंड सुनावले. मात्र, यापुढे कोणी असे कृत्य केल्यास कठोर कारवाई व्हायला हवी, असे प्राणी मित्रांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

ABOUT THE AUTHOR

...view details