मुंबई:बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात (bogus caste verification certificate) न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. खासदार नवनीत राणा (Naveet Rana) यांना अद्याप अटक का झाली नाही? असा सवाल उपस्थित करीत पोलीस मॅनेज झाले आहेत का? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असे न्यायालयाने म्हटले आहे.
Naveet Rana : नवनीत राणा यांना अद्याप अटक का नाही? न्यायालयाचा पोलिसांना संतप्त सवाल - नवनीत राणा यांना अद्याप अटक
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात (bogus caste verification certificate) न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. खासदार नवनीत राणा (Naveet Rana) यांना अद्याप अटक का झाली नाही? असे न्यायालयाने म्हटले आहे.
![Naveet Rana : नवनीत राणा यांना अद्याप अटक का नाही? न्यायालयाचा पोलिसांना संतप्त सवाल Naveet Rana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16859467-thumbnail-3x2-navneetrana.jpg)
न्यायालयाचे पोलिसांना खडे बोल: खासदार नवनीत राणा बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज पोलिसांना खडे बोल सुनावले. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना नवनीत राणा यांना अद्याप का अटक झाली नाही? नवनीत राणा जर महाराष्ट्रातच आहेत तर त्यांना अटक का होत नाही? पोलीस मॅनेज झाले आहेत का? असा गंभीर सवालही न्यायालयाने यासंदर्भात उपस्थित केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार जयंत वंजारी यांनी न्यायालयासमोर नवनीत राणा यांच्या विरोधात जारी केलेल्या अजामीन पात्र वॉरंट वर कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलीस नवनीत राणा यांना अटक करत नाहीत हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. याप्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त आणि लोकसभा अध्यक्ष यांना सदर प्रकरणाबाबत पत्र लिहिण्याची सूचना न्यायालयाने केली. त्याचबरोबर संबंधित पोलीस उपायुक्त यांना या संदर्भात तातडीने कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांची मागणी फेटाळली:दरम्यान नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला असता, या संदर्भात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच अटक करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला होता मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन होताना येथे दिसत नाही. कारवाई का होत नाही असे म्हणत न्यायालयाने अधिक वेळ देण्याची केलेली विनंती फेटाळून लावली आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणातील पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.