महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State cabinet held : राज्यमंत्री मंडळाची बैठक; उद्योगांबाबत आज बैठकीत चर्चा - राज्यमंत्री मंडळाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( The meeting of the state cabinet held ) होणार असून, राज्यातून बाहेर पडत असलेल्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर केवळ तीन महिन्यात पाच मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत.

State cabinet held
राज्यमंत्री मंडळाची बैठक

By

Published : Nov 2, 2022, 9:48 AM IST

मुंबई :राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( The meeting of the state cabinet held ) होणार असून, राज्यातून बाहेर पडत असलेल्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर केवळ तीन महिन्यात पाच मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत. राज्यात होणारे प्रकल्प गुजरात मध्ये नेमके जातात कसे असा सवाल विरोधकांनी उठवत राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळेच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत.

श्वेतपत्रिकेवर देखील या बैठकीत चर्चा: राज्यामध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नाही, अशीही टीका विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे केली जाते. राज्यातील उद्योग राज्याच्या बाहेर जात असल्याने हा मुद्दा गंभीर असून आजच्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी राज्यातील बाहेर जाणाऱ्या उद्योगांबाबतची श्वेतपत्रिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या श्वेतपत्रिकेवर देखील या बैठकीत चर्चा होईल.


परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानाची चर्चा :परतीच्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. राज्यात कोल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने विरोधक करत आहेत. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ केले जाऊन मदत दिली जात असल्याचे राज्य सरकारने सांगितला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना झालेलं नुकसान त्या नुकसाना मधून शेतकऱ्यांना दिली गेलेली मदत या सर्व बाबीचा आढावा देखील आजच्या बैठकीत घेतला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details