मुंबई- लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकांना विविध मलाईदार महामंडळांच्या सदस्य पदाची बक्षिसे दिली आहेत. राज्यातील व 8 विधी भागातल्या शिवसैनिकांवर मुख्यमंत्री मेहरबान झाले असले तरी, मुंबईतल्या शिवसैनिकांचे विशेष ध्यान मुख्यमंत्र्यांनी राखले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शिवसैनिकांना महामंडळांच्या सदस्य पदाची बक्षीसे - मुंबई
नामदेव भगत, शैलेश फणसे, अरुण दुधवडकर, भाऊ कोरगांवकर, गोपाळ लांडगेंसह युवासेनेच्या पवन जाधव आणि अनेक महिला कार्यकर्त्यांना सदस्यपदे बहाल करण्यात आली आहेत.
नामदेव भगत, शैलेश फणसे, अरुण दुधवडकर, भाऊ कोरगांवकर, गोपाळ लांडगेंसह युवासेनेच्या पवन जाधव आणि अनेक महिला कार्यकर्त्यांना सदस्यपदे बहाल करण्यात आली आहेत.
दिवंगत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, अशा अनेक महामंडळांवर शिवसैनिकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.