महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग - corornavirus infection spread among prisoners in mumbai central jail

आर्थर रोड कारागृहात दररोज महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी, भाजीपाल्याची गाडी ये-जा करत असते. याबरोबरच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालय काही मीटर अंतरावर आहे. यामुळे कैद्यांना कोरोनाचे संक्रमण आजूबाजूच्या परिसरातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग

By

Published : May 8, 2020, 10:43 AM IST

मुंबई - आर्थर रोड कारागृहातील तब्बल 103 जण कोरोना संक्रमित झाल्याची बाब समोर आली आहे. यात 77 कैदी आणि 26 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कारागृहात खळबळ माजली आहे. सध्या येथे 2 हजार 800 कैदी आहेत. कोरोनाबाधित कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख

आर्थर रोड कारागृहात 50 वर्षीय कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खळबळ माजली होती. या कैद्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची वैद्यकीय चाचणी केली होती. यात तुरुंग कर्मचारी, स्वयंपाकी व काही कैद्यांचा समावेश आहे. जे. जे. रुग्णालयाने घेतलेल्या चाचणीचा अहवाल आला असून यावरून आर्थर रोड कारागृहातील तब्बल 103 जण कोरोना संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 77 कैदी आणि 26 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना मुंबईतील सेंट जॉर्ज जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

कशी झाली लागण?

आर्थर रोड कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये खटला सुरू असलेल्या या कैद्याला दोन मे रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याच्यावर उपचार सुरू केले असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आर्थर रोड कारागृहातील दोन कर्मचार्‍यांना 27 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या दोन्ही कारागृह कर्मचाऱ्यांना कारागृहाबाहेर विलगीकरणात ठेवले.

आर्थर रोड कारागृहात दररोज महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी, भाजीपाल्याची गाडी ये-जा करत असते. याबरोबरच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालय काही मीटर अंतरावर आहे. यामुळे कैद्यांना कोरोनाचे संक्रमण आजूबाजूच्या परिसरातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आर्थर रोड कारागृहात सध्याच्या घडीला 2 हजार 800 हून अधिक कैदी आहेत. मात्र, या कारागृहाची कैद्यांची मर्यादा 1 हजार 74 एवढीच आहे. काही आठवड्यापूर्वी याच कारागृहात अधिक कैदी झाल्याने जवळपास 400 कैद्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details