मुंबई - लॉकडाउन हा सर्वांसाठी सारखा नसतो. गरिबांचे मोठे हाल होतात, ही परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील लॉकडाउन प्रशासनाने उठवले. परिणामी सर्व व्यवहार सुरळीत झाला. परंतु कोरोनाचा धोका टळला आहे, असे समजू नका कारण सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने कोरोनाचा खरा धोका आता वाढलेला आहे. तेव्हा यापुढे नागरिकांनीच आपली काळजी घेणे आवश्यक आहे. आपली व आपल्या जवळीक यांची काळजी घेणे महत्त्वाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण त्यांच्या आवाहनाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही. मुंबई शहरातील सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बाजारातील गर्दी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कडक निर्बंध असून सुद्धा लोक बिनधास्तपणे निर्बंधाच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. याचा प्रत्यय शनिवारी दादरच्या मार्केटमध्ये दिसून आला.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबईमधील बाजारपेठेत गर्दी कायम - Dadar vegetable market news
मुंबई शहरातील सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बाजारातील गर्दी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कडक निर्बंध असून सुद्धा लोक बिनधास्तपणे नियमत मोडत वावरत आहेत, याचा प्रत्यय शनिवारी दादरच्या मार्केटमध्ये दिसून आला.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबईमधील बाजारपेठेत गर्दी कायम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्ह माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला गर्दीच्या ठिकाणी गर्दी करू नका, असं आवाहन केले होते. तसेच दोन दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी जनतेशी संवाद साधताना दिली होती. परंतु लोकांनी याचा गांभीर्याने विचार घेतलेला नाही. त्यामुळेच दादरच्या बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.