मुंबई -मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी आला होता. मात्र, तो कोरोनाग्रस्ताचा असल्याचे समजल्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांना आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यास सांगितल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
राजावाडी रुग्णालयात कोरोनाचा मृतदेह विच्छेदणासाठी; परिसरात मात्र भीतीचे वातावरण - मृतदेह विच्छेदन
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका आणि खासगी रुग्णालयात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी गर्दी वाढत आहे. आरोग्य विभाग कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असताना, आज राजावाडी रुग्णालयाच्या शव विच्छेदन केंद्रात एक मृतदेह आणण्यात आला होता.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका आणि खासगी रुग्णालयात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी गर्दी वाढत आहे. आरोग्य विभाग कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असताना, आज राजावाडी रुग्णालयाच्या शव विच्छेदन केंद्रात एक मृतदेह आणण्यात आला होता. हा मृतदेह विच्छेदन करताना तो कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले. डॉक्टर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी हा प्रकार समजल्यानंतर. त्यांनी त्वरित पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आले. त्यांनी मार्गदर्शक तत्वानुसार मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बंद करून अंत्यसंस्कार करण्यास सांगितल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हा मृतदेह एका पुरुषाचा असून तो ४५ वर्षाचा होता.