मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामध्ये महाराष्ट्रत आतापर्यंत ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. मुंबईत १४ रुग्ण आहेत. त्यामध्ये एका रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.
कोरोना विषाणूचा मुंबईत सर्वत्र परिणाम - Corona virus affects Mumbai
मुंबईत कोरोना विषाणू बाधित १४ रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती असून मुंबईतील रस्ते सुनसान दिसत आहेत.
कोरोना विषाणूचा मुंबईत सर्वत्र परिणाम
कोरोना विषाणूमुळे मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा कॉलेज बंद असल्यामुळे मुंबईतील रस्ते मोकळे दिसत आहेत. मुंबईतील मार्केटवर देखील मोठी परिणाम झालेला आहे. या सर्वाचा आढावा घेतला आहे आमचे प्रितनिधी अल्पेश करकरे यांनी..