मुंबई- चीनमधील धोकादायक कोरोना व्हायरसने अमेरिकेसह डझनभर देशांना घेरले आहे. जगातील सगळ्या देशांमध्ये हा व्हायरस पसरत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान भारतातही कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण आढळला आहे.
हेही वाचा - मुंबईत शिवभोजन थाळीचे उद्घाटन; मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी
अभिषेक बाफना (वय 36, ताडदेव), असे या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने 3 ते 11 जानेवारी दरम्यान चीनचा प्रवास केला होता. हाँगकाँग येथून हा प्रवासी मुंबईत आला होता. मुंबईत यापूर्वी कोरोना व्हायरसचे 3 संशयित रुग्ण आढळले होते. या तिघांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही)मध्ये पाठवण्यात आले होते.
- काय आहे 'कोरोना व्हायरस' -
कोरोना व्हायरस हा विषाणू प्रजातीतील असून उंट, मांजर यासारख्या प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो. ज्या मनुष्याच्या शरीरात हा विषाणू शिरकाव करतो त्याला सर्दी, ताप, खोकल्याची लागण होऊन श्वसनाला त्रास होतो. हा आजार न्यूमोनियासारखा असल्याने यामुळे रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची शक्यता असते.