मुंबई- याआधी कधी नावही ऐकले नव्हते. अशा जगात हाहाकार माजवणाऱ्या चीनमधील कोरोना व्हायरसने सर्वत्र भितीचे वातावरण पसरविले आहे. आतापर्यंत या महाकाय विषाणूने हजारो बळी घेतले आहेत. चिनी बनावटीचे रंगपंचमीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय बाजारापेठांवरही याचा परिणाम झाला आहे. होळी सणात कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या मशीद बंदर येथील बाजारपेठांत शुकशुकाट आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत सणासुदीवरही पसरली आहे.
कोरोनाचा होळीवरही परिणाम... रंग, पिचकाऱ्यांच्या बाजारात शुकशुकाट
सध्या काहीच दुकाने मशीद बंदर बाजारात लागली आहेत. दुकाने कमी त्यामुळे 10 टक्क्यांनी दर वाढवले आहेत. सध्या जो बाजारत माल आहे. तो दोन महिन्याअगोदर चीनमधून आलेला आहे. भारतीय बनावटीची पिचकारी चिनी पिचकारीच्या किंमतीत दुपटीने आहे. जो माल आमच्याकडे आहे तो कमी प्रमाणात आहे. होळीनिमित्त विकल्या जाणाऱ्या वस्तू कमी प्रमाणात विकल्या जात आहेत.
दरवर्षी रंगपंचमीच्या आधी सात दिवस मशीद बंदर येथील बाजारपेठ गजबजलेली असते. येथे बहुतांश माल चीनमधून येतो. भारताने सध्या चीनमधून येणारा माल थांबवल्यामुळे व्यापारीवर्गाकडे मालाचा तुटवडा आहे. या बाजारपेठत रंगपंचमी निमित्त चिनी पिचकाऱ्या आणि रंगांची मोठी विक्री होती. मात्र, कोरोना आला आणि चीनमधील आयात निर्यातीवर काही बंधने घातली गेली. त्याचा परिणाम आता होळीच्या बाजारावर झाला आहे.
सध्या काहीच दुकाने मशीद बंदर बाजारात लागली आहेत. दुकाने कमी त्यामुळे 10 टक्क्यांनी दर वाढवले आहेत. सध्या जो बाजारत माल आहे. तो दोन महिन्याअगोदर चीनमधून आलेला आहे. भारतीय बनावटीची पिचकारी चिनी पिचकारीच्या किंमतीत दुपटीने आहे. जो माल आमच्याकडे आहे तो कमी प्रमाणात आहे. होळीनिमित्त विकल्या जाणाऱ्या वस्तू कमी प्रमाणात विकल्या जात आहेत, असे येथील दुकानदारांनी सांगितले.
अफवाही कारणीभूत...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सुरुवातीला चिकन आणि मटणमधून कोरोना होत असल्याची अफवादेखील पसरली होती. याची दखल महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आली होती. आता होळीसाठी लागणारे कलर, बलून पिचकारी मोठ्या प्रमाणात चीनमधून येतात. त्यामुळे त्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.
बाजारात तुटवडा...
मुंबईतील बाजारपेठेत विकली जाणारी खेळणी मोठ्या प्रमाणात चीनवरुन येतात. या बाजारपेठेवर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे. मोबाईलच्या सामुग्रीवर देखील याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.